जेट एअरवेज विदेशी पायलटसना काढणार

November 25, 2008 1:14 PM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर जेट एअरवेजने येत्या सहा महिन्यांत आणखी काही विदेशी पायलटस बरोबरचे करार तोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. कॉस्ट कटिंगसाठी या विमान कंपनीनं आता विदेशी पायलटसकडे नजर वळवली आहे. जेटमधल्या भारतीय पायलटसनीही प्रथम विदेशी पायलटसमधूनच कॉस्ट कटिंग करावं असा आग्रह कंपनीकडे केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे जेटनं 36 विदेशी पायलटसना नोकरीतून काढलं आहे. जेटनं त्यांच्या फ्लाईट्सवरचा खर्च कमी करायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून मध्यपूर्वेत जाणा-या विमानांवरील विदेशी पायलटसनाही नोकरीतून बाहेर पडण्यासाठी सूचना दिली जाण्याची शक्यता आहे.

close