स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी महिला डॉक्टर गजाआड

June 8, 2012 12:02 PM0 commentsViews: 19

08 जून

धुळे शहराजवळच्या बिलाडी गावात स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी डॉ. पायल सिंघवीला अटक करण्यात आली आहे. आज पहाटे तिला अटक करण्यात आली आहे. आणि तिच्या सोनोग्राफी सेंटरचा परवानाही तातडीनं रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेच्या पतीला आणि कुटुंबीयांनाही अटक करण्यात आली. एका निनावी तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी हा तपास केला. सिंघवीच्या सेंटरमध्ये 9 जानेवारी 2011 रोजी ही स्त्री भ्रूण हत्या झाली होती. गर्भलिंग निदान करणार्‍या मीनल खलाणे या महिलेचाही तपास सुरू आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. पायल सिंघवीला 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

close