टोरंटोत होणारं संमेलन पुढं ढकललं

June 8, 2012 12:09 PM0 commentsViews: 2

08 जून

टोरंटो इथं होणारं विश्व मराठी साहित्य संमेलन अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आलं आहे. टोरंटो महाराष्ट्र मंडळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतल्या समन्वयाच्या अभावाने हे साहित्य संमेलन पुढं ढकलण्यात आलं आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात 3 ते 5 तारखेदरम्यान हे संमेलन टोरंटो इथं होणार होतं. या संमेलनासाठी घेतल्या गेलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रानकवी ना. धों. महानोर हे या विश्व साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत.

close