आरोग्यमंत्री,महिला बालकल्याणमंत्री आज बीडमध्ये

June 9, 2012 7:48 AM0 commentsViews: 16

09 जून

बीड स्त्री भ्रूण हत्या प्रकरण उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्या पार्श्वभूमीवर तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आणि महिला बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड आज बीडमध्ये आहेत. वर्षा गायकवाड यांनी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. गायकवाड यांनी त्यापूर्वी डॉ. मुंडे हॉस्पिटलची पाहणी केली. गायकवाड यांनी महसूल अधिकारी आणि वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर सुरेश शेट्टी अंबाजोगाईला जाणार आहेत. तिथं एका मूकबधीर महिलेची ते भेट घेणार आहेत. दरम्यान, हिंगोलीमध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचं उल्लघंन केल्याप्रकरणी शहरातले 4 सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले आहे. तर चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

close