माऊलींची वारी आता वेबसाईटवर

June 8, 2012 7:55 AM0 commentsViews: 8

08 जून

वारकर्‍यांना आता ओढ लागली आहे पंढरीची.. पालखी सोहळ्यामध्ये खास मान असतो तो चोपदारांना. माऊलींच्या पालखीमधल्या याच चोपदारांशी थेट ऑनलाईन संवाद साधण्याची संधी लोकांना मिळणार आहे. 'वारी संतांची' या वेबसाईटच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध होणार आहे. येत्या 11 तारखेला ही वेबसाईट लाँच केली जाणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून देशासह विदेशातील वारकर्‍यांना वेबसाईटच्या साह्यामुळे वारीत सहभागी होता येणार आहे. या वेबसाईटवर प्रत्येक शहरातून जिल्ह्यातून निघणार्‍या वारीच माहिती देण्यात येणार आहे.

close