वैष्णादेवीच्या दर्शनाला गेलेल्या 86 जणांना विषबाधा

November 25, 2008 1:32 PM0 commentsViews: 2

पवन बाली 25 नोव्हेंबर, जम्मू मुंबईहून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या 86 जणांना विषबाधा झाली आहे. वैष्णोेदेवी इथे रात्रीचं जेवण घेतलं, त्यातून त्यांना विषबाधा झाल्याचं बोललं जातंय. या सर्वांना उपचारासाठी कटारा इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, 25 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

close