संत मुक्ताईंची पालखी मराठवाड्यात दाखल

June 8, 2012 2:37 PM0 commentsViews: 6

08 जून

संत मुक्ताईंची पालखी सतरा दिवसांचा प्रवास करत आज मराठवाड्यात दाखल झाली आहे. ही पालखी जालन्यात पाच दिवसाचा मुक्काम केल्यानंतर बीड मार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे. पंढरपूरकडे सर्वात अगोदर प्रस्थान करणारी आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेली पालखी म्हणून मुक्ताईच्या पालखीला ओळखलं जातं. मुक्ताईची पालखी जालना जिल्ह्यात आल्यानंतर पाच ठिकाणी मुक्काम करते. ज्ञानोबा, तुकाराम आणि मुक्ताईच्या गजरात या पालखीनं खान्देश, विदर्भ मार्गे मराठवाड्यात प्रवेश केला. यावेळी मुक्ताईच्या दिंडीत महिला आणि पुरूष असे एक हजार वारकरी पांडुरंगच्या दर्शनाची आस घेऊन पंढरपूरला निघाले आहेत.

close