वाहन जळीतकांड प्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात

June 9, 2012 12:17 PM0 commentsViews: 1

09 जून

नाशिकमध्ये झालेल्या वाहनांच्या जाळपोळ प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गुरुवारी शहरातील विवेकानंद नगरमध्ये सात दुचाकी वाहनं आणि एक कार जाळण्यात आली होती. यामागचं नेमकं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही अशाप्रकारे वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यापूर्वी सिडको भागातल्या वाहनांचीही अशाचप्रकारे जाळपोळ करण्यात आली होती. जाळपोळ प्रकरणात यापूर्वी काहीजणांची तडीपारी करण्यात आली होती. तरीदेखील अशा घटना काही अजून थांबल्या नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी चार संशियताना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

close