सरकारी मदतीसाठी भिक मागो आंदोलन

June 8, 2012 2:44 PM0 commentsViews: 4

08 जून

गोंदिया जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मागली गावात 5 जूनला विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे अकरा घरात भीषण आग लागून अकरा शेतकर्‍यांची कुटुंब उध्दवस्त झाली आहेत. या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे. मात्र सरकारने या 11 कुटुंबीयांची थट्टा करीत फक्त 5 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. या अत्यल्प मदतीचा निषेध करत किसान गर्जना संघटनेनं भिक मागो आंदोलन केलं आणि पीडित शेतकरी कुटुंबांना निधी मिळवून दिला. सरकारने दहा-बारा लाख रूपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी किसान गर्जना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

close