वरळी नाका येथील रात्रशाळेची नासधूस

June 9, 2012 1:30 PM0 commentsViews: 1

09 जून

मुंबई महापालिकेच्या वरळी नाका रात्रशाळेत मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आल्याचं उघड झालंय. शाळेतील पुस्तक, बेंचेस , फॅन आणि कॉम्प्युटरची तोडफोड करण्यात आली. सुट्टी संपल्यानंतर कर्मचारी वर्ग शाळेत आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. हा प्रकार कळताच मनसे पदाधिकारी शाळेत पोहोचले आणि पालिका प्रशासनाविरुध्द घोषणाबाजी केली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं. सुरक्षारक्षक नसल्यानं हा प्रकार झाल्याचा आरोप मनसे नगरसेवकांनी केला आहे. तर नवे सुरक्षारक्षक लवकरच नेमू अस पालिकेच्या अधिकार्‍यांनी म्हटलं आहे.

close