मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 32 वाहनांचा विचित्र अपघात

June 9, 2012 1:59 PM0 commentsViews: 3

09 जून

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज संध्याकाळी कामशेत बोगद्याजवळ एक गाडी घसरल्यामुळे एक विचित्र अपघात झाला. या अपघातात तब्बल 32 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहे. या अपघातात सात जण किरकोळ जखमी झाले आहे. अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे त्यामुळे वळणावर वाहन घसरून अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या जुन्या पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक वळवण्यात आली आहे.

close