मारियाने पटकावले फ्रेंच ओपनचे जेतेपद

June 9, 2012 3:19 PM0 commentsViews: 5

09 जून

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात रशियाच्या मारिया शारापोव्हानं जेतेपद पटकावलं. फायनलमध्ये शारापोव्हानं इटलीच्या सारा एरानीचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट शारापोव्हानं 6-3 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्येही शारापोव्हाचं वर्चस्व राहिलं. हा सेट तीनं 6-2 असा सहज जिंकत मॅच खिशात घातली.. शारापोव्हाचं फ्रेंच ओपनचं हे पहिलंच जतेपद ठरलं आहे. या विजयाबरोबरच तीनं करिअर स्लॅमही पूर्ण केलं आहे. प्रत्येक ग्रँड स्लॅम पटकावणारी ती दहावी महिला टेनिसपटू ठरली आहे.

close