सानिया-भूपतीने पटकावले फ्रेंच ओपनचे विजेतेपद

June 8, 2012 5:31 PM0 commentsViews: 1

08 जून

फ्रेंच ओपन टेनिसच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत भारताच्या महेश भूपती आणि सानिया मिर्झाने विजेतेपद पटकावले आहे. फायनलमध्ये त्यांनी सँतियागो गोन्झालिझ आणि क्लॉडिया जेन्स-इन्गोसिकचा 7-6, 6-3 असा पराभव केला. पहिला सेट टायब्रेकरपर्यंत रंगला. त्यामुळे सामना अटीतटीचा होणार अशी चिन्हं दिसू लागली. पण, भूपती-सानियाने टायब्रेकरमध्ये 7-3 अशी बाजी मारली. दुसर्‍या सेटमध्ये तर त्यांना प्रतिकाराचीही संधी दिली नाही. अवघ्या सव्वा तासाच्या खेळात भूपती-सानियानं विजेतेपदाचा बहुमान पटकावला.

close