आयसीएल स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला

November 25, 2008 1:48 PM0 commentsViews: 2

25 नोव्हेंबर इंडियन क्रिकेट लीगची सध्या वर्ल्ड सीरिज सुरू आहे. आणि या स्पर्धेत आयसीएल इंडिया टीमनं आयसीएलच्या पाकिस्तान टीमचा चार विकेट्सनं पराभव केला आहे. पाकिस्तानानं पहिली बॅटिंग करत 9 विकेटच्या मोबदल्यात 165 रन्स केले. नावेद उल हसननं 1 सिक्स आणि 7 फोरच्या सहाय्याने सर्वाधिक चव्वेचाळीस44 रन्स केले. 166 रन्सचं आव्हान गाठताना इंडिया टीमची पहिली विकेट झटपट गेली. पण त्यानंतर अंबती रायडू, इब्राहिम खलिल आणि हेमांग बदानीनं खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत इंडियन टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयानंतर आयसीएल इंडिया आणि आयसीएल वर्ल्ड प्रत्येकी दोन पॉईंटसह क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहेत.

close