बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी श्रीनिवासन गोत्यात

June 8, 2012 5:35 PM0 commentsViews: 2

08 जून

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. याप्रकरणाला आज एक नवं वळण मिळालं. रेड्डी यांच्या कंपनीत बीसीसीआयचे प्रमुख आणि इंडिया सिमेंट्सचे एम डी एन श्रीनिवासन यांनी गुंतवणूक केल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे सीबीआय आता त्यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. पण श्रीनिवासन यांनी हे आरोप फेटाळले आहे. श्रीनिवासन यांनी दावा केलाय की त्यांनी कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार कधी केला नाही. जगन मोहन रेड्डी यांच्या चौकशीदरम्यान श्रीनिवासन यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलंय.

close