सचिनने नाकारला सरकारी बंगला

June 9, 2012 10:10 AM0 commentsViews: 2

09 जून

मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरनं दिल्लीतला सरकारी बंगला नाकारला आहे. बंगला स्विकारला तर करदात्यांचे पैसे वाया जातील अशी भूमिका सचिनने घेतली. नुकतीच सचिननं खासदारपदाची शपथ घेतली होती आणि यामुळे त्याला दिल्लीतल्या तुघलक लेन इथला 5 नंबरचा बंगला देऊ केला होता. सचिनचा हा बंगला काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या बंगल्यासमोरच होता. त्यामुळे क्रिकेटचा महाराजा आणि काँग्रेसचा युवराज सख्खेशेजारी होतील अशी चर्चा रंगली होती मात्र सचिनने या चर्चेला पूर्णविराम दिलं. दिल्लीत फार काळ वास्तव्य नसल्यानं बंगल्याची आवश्कता नाही, काही मोजकेच दिवस मी दिल्लीत येणार असल्यानं सरकारी बंगल्याची आवश्यकता नाही. मला वाटतं ही करदात्यांच्या पैशाची ही उधळपट्टी आहे हा बंगला माझ्यापेक्षा गरज असलेल्या खासदाराला देण्यात आला तर ते अधिक चांगले होईल. मी ज्यावेळेस दिल्लीत येईल तेंव्हा हॉटेलमध्ये राहणंच पसंत करतो खरतर सरकारी बंगल्यापेक्षा राज्यसभेचं सदस्यत्व माझ्यासाठी मोठा गौरव आहे असं दिलदार मत सचिनने व्यक्त केलं.

close