डॉ.मुंडेंना पळून जाण्यास मदत करणार्‍या दोघांना अटक

June 10, 2012 11:27 AM0 commentsViews: 1

10 जून

परळी गर्भपात प्रकरणी सीआयडी चौकशीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण फुलारी आणि संजय धुमाळ असं त्यांचं नाव आहे. डॉक्टर मुंडे पती-पत्नी यांना पळून जाण्यात मदत करण्याचा या दोघांवर आरोप आहे. आरोपींना आश्रय देणं, आर्थिक मदत करणं, असे गुन्हेही त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आले आहे. या दोघांकडे सापडलेल्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डनुसार चार जूनपर्यंत हे दोघंही डॉक्टर मुंडेच्या संपर्कात असल्याचं उघड झालंय. धुमाळ यांचं मुंडे हॉस्पिटलच्या शेजारी मेडिकलचं दुकान आहे. हे दोघंही डॉक्टर सुदाम मुंडेचा मुलगा पापा ऊर्फ व्यंकटेश मुंडे यांचे मित्र असल्याचं समजतं आहे.

close