गोंदियात काळवीटांची विष देवून हत्या

June 9, 2012 10:40 AM0 commentsViews: 4

09 जून

गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील कालीमाटी-चिलाठी इथं तीन काळवीटांची विष देवून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महत्वाचं म्हणजे काळवीट हा शेड्यूल वन मधील हा वन्यजीव असून देशात मोजक्याच ठिकाणी आढळतो. पाण्याच्या शोधार्थ काळवीट शेतात येतात आणि पिंकाची नासधूस करतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेततळ्यात विष घालून ठेवल होतं. विषारी पाणी पिल्यानं या काळवीटांचा मृत्यू झाला. शेतातील होणारी नासधूस टाळण्यासाठी आजुबाजूच्या शेतकर्‍यांनी हा प्रकार घडवल्याचं वन अधिकार्‍याचं म्हणणं आहे. या प्रकरणी वन विभागाने चौकशीला सुरुवात केली आहे.

close