राज्यात गुटखा,पानमसाल्यावर बंदी ?

June 10, 2012 11:35 AM0 commentsViews: 2

10 जून

महसूल बुडाला तरी चालेल, पण राज्यात गुटखा, पानमसाल्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळात ठेवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला राष्ट्रवादी युवती काँग्रेस राजकीय मंचचं पहिलं अधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात अजितदादांनी ही घोषणा केली. या पहिल्या अधिवेशनाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे आहेत. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यापासून ते स्त्री सक्षमीकरणापर्यंतचं काम राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. पण राष्ट्रवादी युवती मंचच्या माध्यमातून सुप्रिया सुळे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा हा मार्ग असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय. स्वत: शरद पवार आणि राष्ट्रवादीचे राज्यातले सर्वच नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. तसेच राज्यभरातल्या प्रत्येक तालुक्यातल्या तरुणी या मेळाव्यात आल्या आहेत.

close