तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

June 10, 2012 8:45 AM0 commentsViews: 4

10 जून

जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचं आज देहूमधून प्रस्थान होणार आहे. राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंड्या देहूत दाखल होत आहेत. देहूत सगळीकडे वारकर्‍यांची लगबग सुरु आहे. विठू नामाच्या गजरात सगळीकडे भजनाचे सूर कानी पडताहेत. आज दुपारी साडेचार वाजता तुकोबारायांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान होणार आहे. परंपरेप्रमाणे पहाटेपासूनच विधीवत पूजा अर्चेचा कार्यक्रम सुरु होणार आहे.

close