पुण्यात रंगणार सवई गंधर्व संगीत महोत्सव

November 25, 2008 2:11 PM0 commentsViews: 7

25 नोव्हेंबर, पुणे स्नेहल शास्त्री जगभरातल्या अभिजात शास्त्रीय संगीत रसिकांसाठीचा आनंदपर्व समजला जाणारा सवई गंधर्व संगीत महोत्सव यंदा 11 ते 14 डिसेंबरला पुण्यात होत आहे. यंदाचं महोत्सवाचं 56 वं वर्ष आहे. पंडीत भीमसेन जोशींना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानं या वेळचा सवाई गंधर्व महोत्सव वेगळा ठरणार आहे. त्यानिमित्तानं पत्रकार परिषद आयोजित केली होती.यावेळी अनेक नव्या दमाच्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कळली. या नव्या संकल्पनेविषयी गायक आणि पंडीत भीमसेनजींचे सुपुत्र श्रीनिवास जोशी सांगतात, "कलेच्या क्षेत्रात नव्या दमाचे अनेक तरुण कलावंत येत आहे. त्यांना गरज असते फक्त संधीची. गुणवत्ता असणा-या प्रत्येक तरुण कलाकाराला आम्ही सवाई गंधर्व महोत्सवात सादरी करणाची संधी देणार आहोत." या महोत्सवात गायक सुहास व्यास, पंडीत जसराज, देवकी पंडीत,पंडीत राजन साजन मिश्रा आणि अर्षद अली यांच्याही मैफली रंगणार आहेत. हा कार्यक्रम पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कुल इथं होणार आहे. कार्यक्रमाची सांगता किराणा घराण्याच्या डॉ. प्रभा अत्रे करणार आहेत.

close