राफेल नदालच क्ले कोर्टचा सम्राट

June 11, 2012 2:21 PM0 commentsViews: 4

12 जून

राफेल नदालनं पुन्हा एकदा फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. वर्ल्ड नंबर नोव्हान जोकोविचचा त्यानं 6-4, 6-3, 2-6, 7-5 असा पराभव केला. फ्रेंच ओपनची फायनल अतिशय रंगतदार झाली. खेळ सुरू होताच नदालनं दमदार सुरूवात केली. पण खेळात पावसानं व्यत्यय आणला. त्यामुळे काल मॅच स्थगित करावी लागली. आज ती पुन्हा सुरू झाली आणि आपल्या झंझावाती खेळीनं नदालनं पुन्हा एकदा आपणच क्ले कोर्टचा बादशाह असल्याचं सिद्ध केलं. फ्रेंच ओपनचं नदालचं हे सातवं ग्रँडस्लॅम आहे. ही कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

close