डॉ.माधव सानपला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडीत

June 10, 2012 2:25 PM0 commentsViews: 4

10 जून

स्त्री भ्रूण हत्येविरोधातल्या कारवाईनं आता वेग धरला आहे. बीडमधील डॉ. माधव सानपला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टर माधव सानपच्या भगवान हॉस्पिटलचा परवाना रद्द केला होता. तरीही त्यांनी हॉस्पिटल सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत हे हॉस्पिटल सील केलं. पण डॉक्टर माधव सानप गेल्या आठ दिवसांपासून फरार होते. अखेर सानपला आज अटक करण्यात आली. आणि कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली.

close