ठाण्यात 17 लाखांचे रक्तचंदन जप्त

June 11, 2012 3:02 PM0 commentsViews: 3

12 जून

ठाण्यात रक्तचंदन तस्करीची घटना उघडकीस आली आहे. आज तब्बल 17 लाख रूपये किंमतीचं रक्तचंदन ठाणे क्राईम ब्राँचनं जप्त केलं आहे. याप्रकरणी क्राईम बाँचनं विनोद विश्वकर्मा आणि प्रवीण जोशी या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडूनच हे चंदन हस्तगत करण्यात आलंय. या चंदन तस्करीमागे मोठी गँग असल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवाय हे चंदन नेमकं कुठून आणलं जातं, या तस्करीमागे कोण आहे याचा तपास क्राईम ब्राँच करत आहे.

close