हिंगोलीत वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

June 10, 2012 2:12 PM0 commentsViews: 2

10 जून

मान्सूनने दोन दिवस दडी मारल्यानंतर विदर्भासह राज्यातल्या इतरही काही भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगोलीमध्ये आज वादळी वार्‍यासह पाऊस पडला. त्यामुळे लोकांची चांगलीच धांदल उडाली. उकाड्यानं त्रस्त जनतेला या पावसानं दिलासा दिला असला तरी काही अडचणींचाही सामना करावा लागला. अनेक घरांवरची पत्रे उडून गेली. तर झाडं पडल्यानं रस्तेही बंद झाले. काही ठिकाणी झाडं तुटून विजेच्या तारांवर पडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला.

close