राष्ट्रपती निवडणूक : प्रणवदांबद्दल काँग्रेस कन्फ्यूज

June 11, 2012 7:48 AM0 commentsViews: 3

12 जून

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे तसे सस्पेंस वाढत आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडी घेतलेले अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीवरुन आता काँग्रेस सरकारच व्दिधा मनस्थिती आहे. आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी आम्हीही राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवू शकतो पण काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा होईपर्यंत वाट पाहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे भक्कम आधारस्तंभ असलेल्या तृणमूल काँग्रेसनेही 'एक हात दो, एक हात लो' चा डाव टाकला आहे. आज सोमवारी पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी आज प्रणव मुखजीर्ंची भेट घेतली. पश्चिम बंगालसाठी आर्थिक पॅकेज मागण्यासाठी ही भेट झाली. पण पॅकेज द्या, पाठिंबा घ्या अशी काही सौदेबाजी या भेटीत झाली का अशी चर्चा आहे.

close