अण्णांच्या दौर्‍यातून 15 लाखांचा मदतनिधी जमा

June 10, 2012 2:44 PM0 commentsViews: 7

10 जून

सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी राज्यव्यापी दौरा केला. या दौर्‍यातून 15 लाख रुपये मदतीच्या रुपात जमा झाले आहेत. अण्णांनी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेतली. सभेनंतर जनतेत मदतीसाठी झोळी फिरवली जायची. प्रत्येक जण आपापल्या परीनं मदत करायचा. त्यातून ही रक्कम उभी राहिली. शिवाय ग्रामसभा, लोकायुक्त, लोकपाल, ग्रामीण विकास याची माहिती असलेल्या 20 हजार पुस्तकांची विक्रीसुद्धा झाली. अण्णांचा दौरा मात्र वादात अडकला. काँग्रेसच्या विरोधात प्रचार करत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये अण्णांच्या ताफ्यातील गाड्यावर दगडफेक केली. तर मुंबईत प्रवेश करत असतांना वाशी येथे गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ ठाण्यात दौर्‍यांची सांगता होणार होती येथील अण्णांची गाडी अडवण्यात आली होती.

close