पावसाचा अंदाज एका क्लिकवर

June 11, 2012 4:53 PM0 commentsViews: 55

12 जून

मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीचे वेळोवेळी मुंबईकरांना अपडेट मिळावे यासाठी महापालिकेनं www.mumbaimonsoon.in ही वेबसाईट आज लाँच केली. महापौर सुनील प्रभू, आयुक्त सीताराम कुंटे यावेळी उपस्थित होते. ही वेबसाईट फेसबुक आणि टिवट्‌रला कनेक्ट केलेली असेल. त्याचबरोबर दर पंधरा मिनिटांनी पावसाची परिस्थित सांगणं, हायटाईडची माहिती देणं, पंप कुठे बसवलेत, कुठे पाणी साचलंय अशा स्वरूपाची माहिती वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे जास्त पावसाच्यावेळी मुंबईकरांनी घराबाहेर पडावं की नाही हा निर्णय घेणं आता शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या वेबसाईटला जरूरभेट द्यावी.

close