दहावीचा निकाल 13 जूनला

June 10, 2012 3:18 PM0 commentsViews: 43

10 जून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 10 वीच्या परिक्षेचा निकाल येत्या 13 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. मागिल वर्षी 17 जूनला दहावीचा निकाल लागला होता यंदाच्या वर्षी चार दिवस अगोदर निकाल लावण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न आहे. बारावीच्या निकालातही मंडळाने यावर्षी आघाडी घेतली. मागिल वर्षी बारावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता यावर्षी दोन दिवसाअगोदर म्हणजे 25 मे रोजी निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. दरवर्षी 10 वीचा निकाल उशीरा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यास उशीर होतो यावर मात करण्यासाठी यंदाच्या वर्षी चार दिवस अगोदर निकाल जाहीर करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. चार दिवस अगोदर निकाल लागत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.

close