बेकायदेशीर गर्भपात करणार्‍या डॉक्टराला अटक

June 12, 2012 10:25 AM0 commentsViews: 3

12 जून

बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई येथे स्त्रीभ्रूण हत्येचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे एका मूकबधीर महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आलाय. ही महिला सहा महिन्याची गरोदर होती. तिसर्‍या महिन्यानंतर गर्भपात करणं बेकायदेशीर असतं. सहाव्या महिन्यात गर्भपात केल्यामुळे महिलेला अतिरिक्त रक्तस्त्राव झाला. त्यामुळे तिची प्रकृती अतिशय गंभीर आहे. ती मृत्यूशी झुंज देतेय. पोलिसांनी याप्रकरणी एमटीपी कायद्यांतर्गत कारवाई करत डॉ. नंदकुमार सोमवंशी याला अटक झाली आहे.

close