मुस्लिम आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा केंद्राला धक्का

June 11, 2012 10:38 AM0 commentsViews: 1

12 जून

मुस्लिम आरक्षणावर टांगती तलवार कायम आहे. मुस्लीम आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला धक्का दिला. आंध्रप्रदेश हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आंध्रप्रदेश हायकोर्टाने रद्द ठरवला होता. त्याविरोधात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण केंद्राने आंध्रप्रदेश हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आणि मुस्लिमांना कुठल्या आधारावर ओबीसी कोट्याअंतर्गत आरक्षण देण्यात आलं असा सवाल कोर्टानं विचारला. केंद्र सरकारला उत्तर द्यायला सुप्रीम कोर्टाने बुधवारपर्यंत वेळ दिला आहे.

close