मुंबईतला मेट्रो प्रकल्प रेंगाळल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली

June 12, 2012 7:31 AM0 commentsViews: 5

12 जून

मुंबईला शांघाय करण्याची इच्छा बाळगूण मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेला मंुबईतला मेट्रो प्रकल्प रेंगाळल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आज मुख्यमंत्र्यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुंबईतल्या एमएमआरडीएकडून राबवण्यात येणार्‍या प्रकल्पांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, त्यांनी भक्ती पार्क मोनोरेल स्टेशन, माहुल परिसरातला बोगदा तसेच घाटकोपर इथल्या मेट्रो रेल्वे स्टेशनच्या कामाची पाहणी केली. मुंबईतल्या रस्त्यांची कामं 30 ते 40 टक्के कमी दरात दिली जाते त्यामुळे त्यांचा दर्जा चांगला नसतो मात्र हे जाणिवपूर्वक केलं जातंय. याबद्दल आम्ही चौकशीचे आदेश दिले आहे याबद्दलची सत्यपरिस्थिती लवकरच बाहेर येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

close