नाशिकमध्ये ईएसआय हॉस्पिटलविरोधात निदर्शन

June 11, 2012 2:14 PM0 commentsViews: 3

12 जून

नाशिकमध्ये कामगारांनी आज ईएसआय (ESI) हॉस्पिटलच्या प्रशासनाविरोधात निदर्शनं केली. या हॉस्पिटलची दुरवस्था झाली, सुविधांचा बोजवारा उडालाय. आयसीयुचा पत्ता नाही, अनेक वर्षांची थकलेली बिलं, त्यामुळे अर्धवट सोडलेले उपचार आणि सुविधांअभावी धोक्यात येणारं रुग्णांचं आरोग्य, अशी या हॉस्पिटलची अवस्था झाली आहेत. नाशिकच्या तिन्ही एमआयडीसीतल्या 60 हजार कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी या हॉस्पिटलवर आहे. त्यासाठी कामगारांच्या पगारातून दरवर्षी 6 कोटी रुपयांची वसुली होते, पण रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. याच्या निषेधात आज निदर्शनं करण्यात आली.

close