प्रणव मुखर्जीच राष्ट्रपती बनण्याची शक्यता

June 12, 2012 11:08 AM0 commentsViews: 2

12 जून

राष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी प्रणव मुखजीर्ंच्या नावाला विरोध करणार नसल्याचं समजतंय. ममता बॅनर्जी आज संध्याकाळी दिल्लीत येणार आहेत. उद्या त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. यासाठी त्यांनी कोलकात्यातली राज्यसभा खासदारांची भेटही रद्द केलीय.

close