जैतापूर प्रकल्पाविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन

June 13, 2012 10:58 AM0 commentsViews: 1

13 जून

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकर्‍यांनी आंदोलन केलं. अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेत शेती करता यावी यासाठी माडबनमधल्या शेतकर्‍यांनी जनावरांसह प्रकल्पस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. पण तिथं हजर असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. शिवसेना आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलंय. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखरी माटे मधील मच्छीमारांनीही मोठ्या संख्येनं मोर्चा काढुन प्रकल्पाला असलेला विरोध जाहीर केला.

close