देशभरात सहा महिन्यात 50 वाघांचा मृत्यू

June 12, 2012 12:55 PM0 commentsViews: 1

12 जून

देशभरात गेल्या 6 महिन्यांत तब्बल 50 वाघांचा मृत्यृ झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यापैकी 19 वाघांची हत्या शिकार्‍यांनी केली. 2011 च्या तुलनेत हा आकडा खूप मोठा आहे. 2011 या संपूर्ण वर्षात 56 वाघांची हत्या झाली होती. नॅशनल कन्झर्व्हेशन ऑथॉरिटीने हा अहवाल दिला आहे. उत्तराखंडमधील कॉर्बेट आणि महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्यात वाघांच्या शिकारी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आलं आहे. पावसाळ्यात अभयारणय बंद असतात. शिकार्‍यांसाठी हा काळ अनुकूल असल्यानं शिकारीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे या काळात देखरेख आणि फूट-पॅट्रोलिंग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

close