तुकोबांच्या पालखीचा पुण्यात मुक्काम

June 13, 2012 11:10 AM0 commentsViews: 4

13 जून

तुकारामांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण काल पिंपरी चिंचवडमध्ये रंगलं. वारकर्‍यांसोबत पुणेकरांनी या रिंगणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या वर्षीपासूनच या रिंगणाची सुरुवात झालेली आहे. यापुढे तुकारामांची पालखी आज आणि उद्या पुण्याच्या निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम करेल. तर ज्ञानोबांच्या पालखीही आळंदीहून निघून दोन दिवस पुण्याच्या विठोबा मंदिरात मुक्काम करेल. यावर्षी ज्ञानोबांची पालखी खडकीमार्गे न येता संगमवाडीमार्गे प्रवेश करेल. पुण्यातल्या पाटील इस्टेट इथे दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं जाईल. प्रस्थान झाल्यानंतर प्रथमच पुण्यामध्ये या पालख्या एकत्र येत आहेत.

close