साध्वी द्रौपदी तर एटीएस दु:शासन – अशोक सिंघल

November 25, 2008 3:16 PM0 commentsViews: 1

25 नोव्हेंबर, दिल्ली मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंगनं न्यायालयात दुसर्‍यांदा एटीएसनं मारहाण केल्याची तक्रार केली आहे. साध्वीनं केलेल्या आरोपाचं उत्तर मोक्का कोर्टानं राज्य सरकारकडून मागितलंय. एटीएसनं मारहाण केल्याचा आरोप काल साध्वीनं केला होता तर साध्वीनं केलेल्या आरोपांचं उत्तर आम्ही कोर्टातच देऊ, असं एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी सांगितलंय. दरम्यान, विहिंप नेते अशोक सिंघल यांनी साध्वी आणि दयानंद पांडेची बाजू घेतली. साध्वी प्रज्ञासिंग ही द्रौपदी असल्याचं विहिंपचे नेते अशोक सिंघल यांचं म्हणणं आहे तर त्यांच्या मते एटीएस दु:शासन आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण पुन्हा एकदा होत असल्याचा आरोप त्यांनी त्यांच्या शैलीत केलाय. अशोक सिंघल आज दयानंद पांडे यांच्या मदतीला ही धावून आले. दयानंद पांडे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. कटात सहभागी असल्याबद्दल त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. दयानंद पांडे स्वंयघोषित शंकराचार्य असं संघपरिवारातून सांगितलं जात असलं तरी अशोक सिंघल यांचं मात्र वेगळंच म्हणणं आहे. 'दयानंद पांडे नाही त्याचं नाव स्वामी अमृतानंद आहे. ते शंकराचार्यांच्या पदाला पोहचले आहेत. त्यांचा अपमान मी सहन करू शकत नाही ', असं सिंघल म्हणाले.

close