छगन भुजबळ यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल

June 13, 2012 12:07 PM0 commentsViews: 12

13 जून

पुणे शिरुर टोलनाक्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह 22 जणांवर 26 कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. आज बुधवारी संजय पाचंगे यांनी कोर्टात दाखल केलेल्या फिर्यादीची दखल घेऊन कोर्टानं पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. जबरदस्तीनं टोल वसुली,वाहनचालकांना हाणामारी,अपूर्ण कामं,झालेले अपघात, टोल परवानगीच्या कागदपत्रात फेरफार,खोटी प्रतीज्ञापत्र करणे,बेकायदा टोल नाका सुरु ठेवणे,जनतेची फसवणूक असे आरोप याचिकाकर्ते संजय पाचंगे यांनी फिर्यादीत केले आहे.याप्रकरणी नाशिकच्या अशोका बिल्डकॉनचे प्रतीनिधी सुनील रायसोनी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांसह 10 सरकारी अधिका-यांचा समावेश आहे.

close