‘राष्ट्रपतीपदासाठी प्रणवदांना काँग्रेसची पहिली पसंती’

June 13, 2012 12:33 PM0 commentsViews: 6

13 जून

राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसची पहिली पसंती कोणाला याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सस्पेन्सवर आज अखेर पडदा पडला. तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसची पहिली पसंती प्रणव मुखर्जी यांनाच असल्याचं स्पष्ट केलं आहे. आज संध्याकाळी ममता बॅनजी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाधी यांची भेट घेतली. त्यावेळी सोनिया गांधी यांनी पहिली पसंती म्हणून प्रणव मुखर्जी यांचं नाव घेतलं तर दुसरी पसंती उपराष्ट्रपती हमीद अन्सारीना दिली आहे. या भेटीनंतर ममतादीदींनी मुलायम सिंग यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, ममतादीदींनी बंगालसाठी कोणत्याही पॅकेजची मागणी केली नसल्याचं स्पष्ट केलं. मी जेव्हा जेव्हा दिल्लीला येते तेव्हा अशा बातम्या विनाकारण पेरल्या जातात हे सगळे आरोप अपमानकारक आहे. राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देणे आणि पॅकेजची मागणी हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहे असंही ममतादीदींनी ठणकावून सांगितलं.

close