‘प्रणवदांना पाठिंबा पण जसवंत सिंग यांना उपराष्ट्रपती करा’

June 12, 2012 4:43 PM0 commentsViews: 44

12 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप राष्ट्रपती पदासाठी प्रणव मुखजीर्ंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. पण भाजप खासदार जसवंत सिंग यांना उपराष्ट्रपती करावं अशी त्यांची अट आहे. जसवंत सिंग यांनी आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांचीही भेट घेतली. भाजपमधला एक गट जसवंत सिंग यांच्यासाठी लॉबिंग करत असल्याचं समजतंय. लालकृष्ण अडवाणी यांचाही जसवंत सिंग यांना पाठिंबा असल्याचं समजतंय. एनडीए सरकारच्या काळात जसवंत सिंग यांनी परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम सांभाळलं आहे.

close