‘कलाम,मनमोहन,चटर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पसंती’

June 13, 2012 1:50 PM0 commentsViews: 9

13 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. आज दिल्लीत ममतादीदींच्या एंट्रीमुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला वेगळं वळणं मिळालं. सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जी आणि हमीद अन्सारी यांच्या नावाला दिलेलेल्या पसंतीला ममतादीदींनी केराची टोपली दाखवली आहे. ममतादीदी आणि मुलायम सिंग यांनी सोनियांच्या पसंतीला कडाडून विरोध केला. तर एपीजे अब्दुल कलाम,मनमोहन सिंग, सोमनाथ चटर्जी यांची नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवली आहे. एकंदरीतच राष्ट्रपतीपदावरुन सुरु झालेल्या सहमतीपदावरुन यूपीएतच रस्सीखेच सुरु झाली आहे.

आज दुपारी तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बनर्जी दिल्लीत दाखल झाल्यात. संध्याकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनियांनी प्रणव मुखर्जी आणि हमीद अन्सारी यांच्या नावाला पसंती दर्शवली. सोनियांची भेट घेतल्यानंतर ममतादीदींनी सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांची घरी जाऊन भेट घेतली. मुलायम सिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सोनियांच्या पसंतीला नापसंती दर्शवली. जर राष्ट्रपती करायचे असेल तर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम,पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना करावे असं सुचना केली. प्रणवदा बंगालचे असले तरी सोमनाथ चटर्जी हे सुध्दा बंगालचेच आहे त्यामुळे त्यांना पाठिंबा देऊ त्याच बरोबर एपीए कलाम यांनी राष्ट्रपतीपद अगोदर भूषवले आहे त्यामुळे त्यांना आम्ही पसंती देत आहोत असं ममतादीदी आणि मुलायम सिंग यांनी स्पष्ट केलं. आम्ही सुचवलेल्या नावांचा सर्वपक्षियांनी विचार करावा आणि सर्वबहुमत द्यावे असं आवाहनही ममतादीदींनी केलं. पण ममतादीदी आणि मुलयाम सिंग यांच्या गुगलीमुळे आता युपीएसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

राष्ट्रपतीपदासाठी रस्सीखेचएकूण मतं (खासदार+आमदार) : 10,98,882राष्ट्रपती निवडीसाठी आवश्यक मतं : 5,49,442—————–यूपीएची मतं : 4,49,133काँग्रेस : 3,30,405तृणमूल : 45,925जादूई आकडा : 549442——–यूपीए+राजद+सपा+बीएसपी : 5,71,6444,49,133 + 10,350 + 66,688 + 45,473जादूई आकडा : 549442—————————सपा आणि तृणमूल वगळता : 4,59,031बहुमतापेक्षा 90,411 मतं कमीजादूई आकडा : 549442—————एनडीएची मतं : 3,04,785बहुमतापेक्षा 2,44,657 मतं कमीजादूई आकडा : 549442

राष्ट्रपती पदासाठी आज जी नावं चर्चेत आली, त्यांची बलस्थानं आणि उणिवा काय आहेत

मनमोहन सिंगबलस्थानंस्वच्छ चारित्र आणि प्रामाणिकपणा

उणिवाआर्थिक अडचणीच्या काळात सरकारला गरजविरोधकांच्या पाठिंब्याची शक्यता नाहीप्रशासकीय पातळीवर सरकार अपयशी ठरल्याची एकप्रकारे कबुली

सोमनाथ चॅटर्जीबलस्थानंउत्कृष्ट संसदपटू

उणिवास्वतंत्रपणे निर्णय घेतात, काँग्रेसचं मतते काँग्रेस नेते नाहीत्यांच्या उमेदवारीमुळे डावे संतापतील

ए. पी. जे अब्दुल कलामबलस्थानंजनतेचा राष्ट्रपती म्हणून लोकप्रियउणिवाएनडीएचे उमेदवार अशी ओळखकोण होणार राष्ट्रपती ?प्रणव मुखर्जीबलस्थानं- सरकार आणि घटनेचा गाढा अनुभव- सर्वच पक्षांत मानाचं स्थानउणिवा- 10 जनपथशी खूप चांगले संबंध नाहीत- यूपीए-2 च्या अडचणी सोडवण्यासाठी पक्षाला गरज

हमीद अन्सारीबलस्थानं- विद्यमान उपराष्ट्रपती- काँग्रेसची पहिली पसंतीउणिवा- लोकपाल विधेयकाच्या वादानंतर भाजपकडून तीव्र विरोधाची शक्यता

close