कोण होणार राष्ट्रपती ?

June 12, 2012 5:05 PM0 commentsViews: 13

12 जून

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रपतीपदाची शर्यत आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज मंगळवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. त्यामुळे देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहे. 19 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होईल. तर मतमोजणी 22 जुलैला होईल. नव्यानंच पदभार स्वीकारलेले मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जून आहे. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जुलै आहे. नवा राष्ट्रपती एकमतानं निवडून आला तर मात्र मतमोजणीची गरज पडणार नाही.

राष्ट्रपती निवडणूक जाहीर झाली आहे. अर्थातच आता सगळ्यांना उत्सुकता आहे कोण होणार राष्ट्रपती याची… या शर्यतीत सर्वात आघाडीवर नाव आहे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचं. सूत्रांच्या माहितीनुसार तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी प्रणव मुखजीर्ंच्या नावाला विरोध करणार नाही. ममता बॅनर्जी आज संध्याकाळी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांचीही भेट घेतली. कुठल्याच आघाडीकडे बहुमत नसल्यामुळे तृणमूल आणि समाजवादी पक्षांकडे या निवडणुकीच्या चाव्या असल्याचं मानलं जातंय.

ममता बॅनर्जी उद्या बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकारिणीत राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार निवडण्याचे सर्व अधिकार सोनिया गांधींना दिले आहे. सोनियांनी यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुक अध्यक्ष करुणानिधी आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनीच फोनवरुन ममतांना चर्चेला बोलवल्याची माहितीय. पण ममता बॅनर्जी आणि काँग्रेस सध्यातरी पत्ते उघडायला तयार नाही.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणा-कुणाची नावं आघाडीवर आहेत

प्रणव मुखर्जी

बलस्थानं- सरकार आणि घटनेचा गाढा अनुभव- सर्वच पक्षांत मानाचं स्थानउणिवा- 10 जनपथशी खूप चांगले संबंध नाहीत- यूपीए-2 च्या अडचणी सोडवण्यासाठी पक्षाला गरज_____________________________________मीरा कुमार

बलस्थानं- महिला आणि दलित- विरोध होण्याची शक्यता कमी

उणिवा- सलग दोन महिला राष्ट्रपती होणं कठीण_____________________________________

हमीद अन्सारी

बलस्थानं- विद्यमान उपराष्ट्रपती- काँग्रेसची पहिली पसंती

उणिवा- लोकपाल विधेयकाच्या वादानंतर भाजपकडून तीव्र विरोधाची शक्यता

_____________________________________

राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते ?

राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होत नसते. पक्षातर्फे व्हिपही काढला जात नाही. राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीसुद्धा गुप्त मतदानच होतं. राज्यसभेचे महासचिव हे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहातात. – निवडून दिलेले सर्व खासदार आणि आमदार मतदान करतात- यावेळी एकूण 776 खासदार आणि 4,120 आमदार मतदान करतील- प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य 708 आहे- प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य हे त्या त्या राज्याच्या लोकसंख्येवर ठरतं- पसंतीक्रमानुसार मतदान केलं जातं

राष्ट्रपती पदासाठी रस्सीखेच

राष्ट्रपती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या यूपीए आणि भाजप नेतृत्वाखालच्या एनडीए या दोघांकडेही पुरेसं बहुमत नाही. त्यामुळे समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांची मतं या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. कुठल्या पक्ष आणि आघाडीकडे किती टक्के मतं आहेत

युपीए : 42 टक्के एनडीए : 28 टक्केबिगर युपीए, बिगर एनडीए : 24 टक्केनिर्णायक मतंसपा+बसपा+तृणमूल : 15%

close