मारूती नवलेंविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा :कोर्ट

June 13, 2012 4:13 PM0 commentsViews: 6

13 जून

पुण्यातील पवन गांधी ट्रस्टची जमीन हडप केल्या प्रकरणी सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले यांना हायकोर्टाने पुन्हा एक झटका दिला आहे. नवले यांनी हायकोर्टात पवन गांधी ट्रस्ट आणि पोलिसांवर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल करताना नवले यांनी मावळ प्रांत यांच्या न्यायालयाचे बनावट सही शिक्के तयार करून आदेश तयार केले होते. या आधारे नवले यांनी दावा दाखल केला होता. नंतर त्यानी तो गुन्हा मागे घेतला. पण कोर्टाच्या हे लक्षात आल्यानंतर कोर्टाने नवलेंना 15 हजार रूपये दंड सुनावला तसेच नवलेंविरोधात पोलिसांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितलंय.

close