एप्रिलचा औद्योगिक विकास दर फक्त 0.1 टक्के

June 12, 2012 5:24 PM0 commentsViews: 3

12 जून

भारतीय अर्थव्यवस्थेसमोरच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं दिसत नाही. एप्रिल महिन्यात औद्योगिक विकास दर फक्त 0.1 टक्के इतकाच नोंदवण्यात आलाय. पण मार्चमध्ये हा दर वजा 3.5 टक्के इतका कमी होता. खाण आणि कॅपिटल गुड्स उद्योगात मोठी घसरण झाली आहे. तर उत्पादन क्षेत्रात नाममात्र वाढ झाली आहे. ही परिस्थिती निराशाजनक असल्याचं अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी म्हटलं आहे. दरम्यान, भारताचं पत मानांकन घसरण्याची शक्यता स्टँडर्ड अन्ड पुअर्सनं वर्तवली होती. पण अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी या वृत्ताचं खंडन केलंय. ही परिस्थिती बदलेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

close