तरुणाई करणार कवितांचा प्रसार – मंगेश पाडगावकर

November 25, 2008 3:18 PM0 commentsViews: 64

25 नोव्हेंबर, मुंबई" गेली 60 वर्षं मी ज्यांच्यासाठी मराठी कविता लिहिली आहे, त्या माझ्या लोकांच्या प्रेमामुळेच मला ' महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे, " असं कवीवर्य मंगेश पाडगांवकर म्हणाले. नुकतच मुंबईत ' महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार पटकावणारे 13 वी असामी आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या समारंभाला उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. मराठी कवितांचा प्रसार आणि प्रसार वाढायला पाहिजे अशी खंत मंगेश पाडगावकरांनी व्यक्त केली मराठी कविता टीकवायची असेल, वाढवायची असेल तर आजच्या मराठी मुलांनी कवितांचं वाचन करायला पाहिजे, असा सल्लाही पाडगावकरांनी दिला. ' मंगेश युग ' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून पाडगावकरांच्या कविता, गाणी आणि वात्रटिकांची मेजवानी त्यांच्या चाहत्यांना मिळाली. रवींद्र साठे, सलील कुलकर्णी, कौशल इनामदार, अजित परब, जितेंद्र जोशी यांचा ' मंगेश युग 'मध्ये सहभाग होता.

close