ममता, मुलायम यांनी दिलेली नावं काँग्रेसनं फेटाळली

June 14, 2012 9:30 AM0 commentsViews: 1

14 जून

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता अधिकचं रंगतदार होत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावावर ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच ममता आणि मुलायम सिंग यांनी दिलेली नावं काँग्रेसनं फेटाळली आहे. काँग्रेसने आज पहिल्यांदा ममता बॅनर्जी यांच्यावर थेट टीका केली. ममतांनी अशा पद्धतीनं नाव जाहीर करायला नको होती. नाव जाहीर करुन त्यांनी मर्यादा ओलांडल्यात अशी टीका काँग्रेसनं केली.

तसेच काँग्रेसनं अजूनपर्यंत उमेदवार निश्चित केलं नसल्याचं जनार्दन दिवेदी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान ,आज काँग्रेसच्या कोअर कमिटीची संध्याकाळी बैठक होणार आहे. त्यापूर्वी शरद पवार सोनिया गांधींची भेट घेणार आहे. तसेच काँग्रेसने आता मुलायम सिंह यांच्याशी संपर्क साधल्याचं समजतंय.

तर दुसरीकडे मुलायम सिंग यांनी आपल्याला फोन करुन आपण कालच्याच भूमिकेवर ठाम असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याच नावाला आपला पाठिंबा असल्याचंही मुलायम सिंह यांनी स्पष्ट केल्याचा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला.

close