ज्येष्ठ गझलगायक मेहदी हसन यांचं निधन

June 13, 2012 9:58 AM0 commentsViews: 4

13 जून

भारतीय उपखंडात आपल्या सुरेल आवाजानं राज्य करणारे गझलचे बादशाह मेहदी हसन यांचं आज कराचीत निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मेहदी हसन यांचा जन्म 1927 मध्ये राजस्थानमधील लूना गावात झाला. 1947 च्या फाळणीदरम्यान त्यांचं कुटुंब पाकिस्तानात गेलं. गझल विश्वातमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना शहशाह ए- गझल ही उपाधी बहाल करण्यात आली होती. त्यांच्या निधनामुळे मैफल खामोश झालीय अशी प्रतिक्रिया व्यक्त होतेय.

राजस्थानमधल्या लुना गावात जन्मलेले मेहदी हसन यांच्या रोमारोमात संगीत होतं. गझल हीच त्यांची दुनिया होती. पण त्यांचे वडील उस्ताद अजीम खान यांनी त्यांना ध्रुपद गायकीची दीक्षा दिली आणि त्यांच्या सूरांना शास्त्रीय संगीताचा बाज आला. तरुण वयातच मेहंदी हसन यांच्या ध्रुपद आणि खयाल गायकीच्या मैफली सुरू झाल्या. पुढे 1935 मध्ये जेव्हा फाळणीचे वारे वाहू लागले तेव्हा मेहंदी हसन त्यांच्या कुटुंबासह पाकिस्तानला गेले. पण देशांच्या सीमा त्यांच्या सूरांना अडवू शकल्या नाहीत.

पाकिस्तानमध्ये आपल्या गुजराणीसाठी त्यांना सायकलचं दुकान उघडावं लागलं होतं. पण संगीत त्यांच्यापासून कधीही दूर गेलं नाही. त्याचेवळी 1957 मध्ये त्यांना रेडिओ पाकिस्तानमधून आमंत्रण आलं. त्यांना ठुमरी गायनाचा मौका मिळाला. त्यावेळी बेगम अख्तर आणि मुख्तार बेगम यांच्या गजलांचा सिलिसला होता पण मेहंदी हसन यांची उर्दू गजलवर चांगलीच हुकूमत असल्यामुळे हळुहळू ते लोकप्रिय होत गेले.

ऐंशीच्या दशकात मेहंदी हसन आजारी पडले आणि मग त्यांचं गाणं थांबलं पण 2010 मध्ये त्यांच्या गझलगायकीत आणि भारत – पाकिस्तानच्या नात्यामध्ये एक हृद्य क्षण आला. मेहंदी हसन यांनी पाकिस्तानात एक गाणं रचून गायलं आणि भारतात लतादीदींनी त्याला आवाज दिला. मेहंदी हसन यांना पाकिस्तान, भारत आणि नेपाळमध्ये असंख्य सन्मान मिळाले. देशांच्या सीमा ओलांडून त्यांचा आवाज जगभरामध्ये गुंजत राहिला.

close