डॉ. सुदाम मुंडे 22 दिवसांपासून मोकाट

June 14, 2012 9:55 AM0 commentsViews: 1

18 मे

गर्भपातप्रकरणी फरार असलेल्या डॉ.सुदाम आणि डॉ. सरस्वती मुंडे याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. डॉ. मुंडेला फरार घोषित करुन 22 दिवस उलटले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना झाली आहे तसेच मुंबई क्राईम ब्राँचही डॉ. मुंडेचा शोध घेत आहे. पाच राज्यांमध्येही डॉ.मुंडेचा शोध सुरू आहे. 18 मे रोजी मुंडे यांच्यावर बेकायदेशीर गर्भपात करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मुंडे दाम्पत्य फरार झाले आहे.

close