इचलकरंजीत काविळीच्या साथीच्या थैमान ;10 जणांचा बळी

June 13, 2012 9:52 AM0 commentsViews: 1

13 जून

कोल्हापूर जिल्हातील इचलकरंजीत काविळीच्या साथीच्या थैमानात आतापर्यंत 10 जणांचा बळी गेला आहे. आरोग्य विभाग साथीला रोखण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. आज पहाटे नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी के वाय चव्हाण यांचा काविळमुळे मृत्यू झाला. तर काल दिपाली आठमुठे या महिला डॉक्टरचा मृत्यू झाला होता. आयजीएम हॉस्पिटलमध्ये 3,190 कावीळ झालेल्या रुग्णांवर उपचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील 3 बर्फाचे कारखाने बंद करण्यात आलेत तर हातभट्टी दारुचे गुत्यावर कारवाई करण्यात आली आहे. शहराला होणारा पंचगंगा नदीचा पाणीपुरवठा थांबवण्यात आलाय आता केवळ कृष्णा नदीचं पाणी शहरासाठी सोडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाचं आरोग्य पथकही शहरात दाखल झालं आहे.

close